वाशी /प्रतिनिधी :-

 तालुक्यातील सरमकुंडी येथे शिवसेनाप्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शिवसेनेचे सरपंच दिनकर शिंदे यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ५७ नागरिकांनी रक्तदान केले .  या रक्तदान शिबिराचे उद्घाटन भैरवनाथ शुगर मिलचे कार्यकारी संचालक केशव सावंत,वाशीचे नगराध्यक्ष नागनाथ नाईकवाडी,शिवसेना तालुकाप्रमुख ॲड सत्यवान गपाट,शिवसेना उपतालुका प्रमुख विकास तळेकर यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी सरमकुंडी चे सरपंच दिनकर शिंदे,प्रवीण गायकवाड,अरुण भाकरे,पत्रकार बंडू मुळे,वामन गायकवाड,शांती कर शिरसागर,चंद्रकांत पाटील, मुरलीधर भाकरे,अशोक डोके, गणेश गायकवाड,राधाकृष्ण गवळी,नरसिंग मुळे,संजय धोत्रे, तुषार गायकवाड,उमेश गायकवाड,अजय गायकवाड,पप्पू गायकवाड,जितेश गायकवाड, अमोल कुटे,दया काळे,अमित कोळी,मनोज शिंदे,राहुल भाकरे, संदीप शिंदे,सचिन शिंदे,नितीन गायकवाड,प्रशांत गायकवाड, अक्षय जावळे,श्याम सुरवसे, बबलू गिरी,अजय लोखंडे,महेश लोखंडे,धनंजय हाके,महेश गिराम,आदी शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


 
Top