उस्मानाबाद/ प्रतिनिधी
येथील आनंद नगर भागातील रहिवाशी शारदा मधुकरराव थिटे (वय.65) यांचे मंगळवारी सायंकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. बुधवारी (ता. 11) त्यांच्या पार्थीवावर सलगरा मड्डी (ता. तुळजापुर) या त्यांच्या मुळगावी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पती, चार मुले, सुना नातवंडे असा परिवार आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सेवानिवृत्त मुख्याधिकारी मधुकरराव थिटे यांच्या त्या पत्नी होत.
