उस्मानाबाद/ प्रतिनिधी
विविध कारागृहातुन शिक्षा भोगुन मुक्त झालेल्या जिल्हयातील निवासी मुक्त्बंदी व अपराधी परिविक्षा अधिनियम 1958 अंतर्गत विविध न्यायालयाकडुन चांगल्या वर्तणुकीच्या बंधपत्रावर 03 वर्षापर्यंतच्या देखरेखीखाली सोडलेल्या परिविक्षाधीन अपराधी यांच्या पुनवर्सनासाठी सदर योजना राबविण्यात येते.मुक्तबंदी व परिविक्षाधीन यांनी आपले भावी आयुष्य शांततेते व्यतित करावे तसेच पुन्हा गुन्हेगारी कृत्याकडे वळु नये.यासाठी या योजनेअंतर्गत स्वयंरोजगारासाठी,छोटया व्यवसायासाठी (शेळीपालन,गोपालन,दुग्धउत्पादन,किराणा,दुकान,हॉटेल,पाईपलाईन इ.)रु.25,000/-अनुदान देण्यात येते.
सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी उस्मानाबाद जिल्हयातील मुक्तबंदी व परिविक्षाधीन यांनी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी,कार्यालय,कक्ष क्र.10,तळ मजला,मध्यवती प्रशासकीय इमारत,उस्मानाबाद येथे कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे अहवान जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्री.बी.एस.निपाणीकर उस्मानाबाद यांनी केले आहे.