उस्मानाबाद/ प्रतिनिधी
उस्मानाबाद जिल्हयात सन 2019-20 साठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना व बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना राबविण्यात येत आहे. या योजनेत नविन सिंचन विहिर पॅकेज अंतर्गत नविन विहीर २५००००/-रु, पंप संच २५०००/- रु, विदयुत कनेक्शन १००००/-रु , ठिंबक | तुषार संच ५०,०००/- किंवा २५,०००/- रु. असा लाभ देण्यात येणार आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजनेत १४२ लाभार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. त्यापैकी ११२ लाभार्थ्यांनी नविन विहिरीचे खोदकाम सुरु केले असुन अद्याप २५ लाभार्थीनी नविन विहिरीचे खोदकाम सुरु केलेले नाही. बिरसा मुंडा कृषि क्रांती योजनेत निवड १२ लाभार्थ्यांपैकी ०६ लाभार्थ्यांनी नविन विहिरीचे खोदकाम सुरू केलेले नाही. ज्या लाभार्थीनी विहिरीचे खोदकाम सुरू केलेले नाही. अशा लाभार्थ्यांना विहिरीची आवश्यकता नाही. असे गृहित धरुन त्यांचे नाव मंजुर यादीतून कमी करुन प्रतिक्षाधीन यादीतील लाभार्थ्यांना लाभ देण्याची प्रक्रीया पुर्ण करण्यात येईल, असे आवाहन करण्यात येत आहे.
सदर योजनेत निवडलेल्या लाभार्थ्यांसाठी ३१ मार्च २०२१ ही अंतिम मुदत असल्यामुळे त्यानंतर होणा-या कामाचे अनुदान या योजनेतून दिले जाणार नाही. याची संबधित लाभार्थ्यांनी नोंद घ्यावी.
अधिक माहितीसाठी निवड झालेल्या लाभार्थ्यांनी संबधित पंचायत समितीचे कृषि अधिकारी (विघयो)/गट विकास अधिकारी यांचेशी संपर्क साधावा. असे आवाहन दत्ता (आण्णा) साळुके, सभापती कृषि व पशुसंवर्धन, अनिलकुमार नवाळे, अति.मुख्य कार्यकारी अधिकारी, डॉ.टि.जी.चिमनशेटे, कृषि विकास अधिकारी, जिल्हा परिषद उस्मानाबाद यांनी केले आहे.