उस्मानाबाद/ प्रतिनिधी

भूम तालुक्यातील पाथरुड येथील सुधीर संदीपान बोराडे हे ऑॅटोरीक्षाने जात असताना त्यांना दि.२३ जुलै रोजी रात्री देवगाव चौकाजवळ कार व दुचाकीवरून आलेल्या चौघांनी मारहाण करून लुटले होते. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर यातील तीन आरोपींना अंभी पोलिसांनी गजाआड करत गुन्ह्यातील कार जप्त केली आहे.

सुधीर बाेराडे हे ऑटोरिक्षाने देवगाव चौकातून जात होते. यावेळी स्विफ्ट कार (क्र. एमएच १४ - ६१५१) मधून आलेल्या दोघांनी व मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी ऑॅटोरीक्षा अडवून चालक विजय खुने यांना शिवीगाळ करून, लाथाबुक्क्यांनी मारहाण करत पाठीमागे बसलेल्या सुधीर बोराडे यांच्या खिशातील चार हजार रुपये काढून घेतले होते. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर अंभी पोलिस ठाण्याचे प्रभारी सहायक पोलिस निरीक्षक अशिष खांडेकर, उपनिरीक्षक वाघुले, पोकॉ राहुल गायकवाड, अकोस्कर यांच्या पथकाने माहिती काढून यातील एक आरोपी योगेश बबन काळे रा. धनेगांव ता. जामखेड यास दि.९ ऑक्टोबर रोजी अटक करण्यात आली होती. दरम्यान, तपासात त्याचे फरार साथीदार महेश अंकुश शिंदे (रा. चिंचपुर (बु.), ता. परंडा) व अमोल बाळासाहेब काळे (रा. धनेगांव) या दोघांना दि.११ नोव्हेंबर रोजी ताब्यात घेउन गुन्ह्यातील चोरीची रक्कम व गुन्हा करण्यास वापरलेली एक मोटारसायकल व स्विफ्ट कार जप्त केली आहे.


 
Top