उस्मानाबाद / प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ मुंबई-द्वारा घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२० मध्ये अंतिम वर्ष डी.फार्मसी औषधनिर्माण शास्त्राचा निकाल नुकताच जाहीर झाला असून उस्मानाबाद येथील आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ संचलित,केशवराव पाटील इन्स्टिट्यूटचा डी.फार्मसी द्वितीय वर्षाचा १००% निकाल लागला.
यामध्ये कु. वैष्णवी शिवानंद तानवडे या विद्यार्थिनीने ९८.२०% घेऊन प्रथम,साक्षी विजयसिंह देशमुख, शिवानी भारत गवळी, अरबाज अब्दुल हमीद शेख ९७.५०% गुण मिळवून या विध्यार्थ्यानी द्वितीय क्रमांक पटकाविला,प्रियांका विकास जालन या विद्यार्थिनीने ९७.३० % गुण घेऊन तृतीय शुभांगी पोपट डोके,वैष्णवी रवींद्र बुरकुले ९७.२०% टक्के गुण घेऊन चतुर्थ क्रमांक मिळविला तसेच पांडुरंग गोरख पांचाळ याने ९६.६०% टक्के गुण घेऊन पाचवा क्रमांक मिळविला. या महाविद्यालयातील ९० % टक्के पेक्षा जास्त गुण मिळविलेले ३० विद्यार्थी आहेत.
गुणवंत विद्यार्थ्यांचे संस्था सरचिटणीस के.टी.पाटील, संस्थाध्यक्ष सुधीर पाटील, प्रशासकीय अधिकारी आदित्य पाटील, प्राचार्य उल्हास सुरवसे व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कौतुक केले.