कळंब तालुका शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या सभासदांना या वर्षी १५ टक्के लाभांश देण्याचा व कर्ज मर्यादा १५ लाख रुपये करण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला असल्याची माहीती शिक्षक पतसंस्थेचे अध्यक्ष बाळकृष्ण तांबारे यांनी दिली.
कळंब तालुका शिक्षक सहकारी पतसंस्था ही जिल्ह्यातच नाही तर संपुर्ण राज्यात नावाजलेली शिक्षकांची पतसंस्था आहे .या संस्थेच्या संचालक मंडळाने आज पर्यंत सभासदांच्या हिताचे अनेक निर्णय घेऊन राज्यात लौकिक मिळवला आहे. त्यात प्रामुख्याने सभासदांच्या मुलीच्या विवाह प्रसंगी “शुभमंगल कन्यादान योजने अंतर्गत मुलीस ११ हजार रुपये कन्यादान” म्हणून दिले जातात तसेच ही पतसंस्था स्वभांडतुन कर्ज वाटत करत असून इतर कोणत्याही वित्तीय संस्थेचे कर्ज घेत नाही. कर्जाचा व्याज दर इतर सहकारी पतसंस्थेपेक्षा अल्प असून द.सा.द,शे.नऊ टक्के आहे तसेच प्रत्येक वर्षी सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा रोख पारितोषिक देऊन ही संस्था सन्मान करते. सभासदाचा कोणत्याही कारणामुळे मृत्यू झाल्यास त्या सभासदाचे संपूर्ण कर्ज माफ करणारी हि राज्यातील एकमेव पतसंस्था आहे. गेल्या आर्थिक वर्षात संस्थेची आर्थिक उलाढाल ४३ कोटी असुन संस्थेकडे ४ कोटी पेक्षाजास्त मुदतठेवी जमा आहेत, सतत आँडीट वर्ग “अ” आहे.
दि.२९ आक्टोंबर रोजी संस्थेचे अध्यक्ष बाळकृष्ण तांबारे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत सन.२०१९-२०२० या आर्थिक वर्षात झालेल्या नफ्यातुन सभासदांना १५ टक्के लाभांश देण्याचा व कर्ज मर्यादा १२ लाख रुपया वरुन १५ लाख रुपये करण्याचा निर्णय ही संचालक मंडळाने घेतला असल्याचे श्री.तांबारे यांनी सांगितले .
या बैठकीस संस्थेचे उपाध्यक्ष भूषण नान्नजकर ,संचालक भक्तराज दिवाने,शिवराज मेनकुदळे,चंद्रकांत शिंदे,गणेश कोठावळे,तोफीक मुल्ला,सतिश येडके,अविनाश पवार,पांडुरंग वाघ,दशरथ मुंडे,धनाजी अनपट,नागेश टोणगे, श्रीमती वैशाली क्षिरसागर,श्रीमती ज्योती ढेपे व सचिव संतोष ठोंबरे उपस्थित होते.
संचालक मंडळाच्या या निर्णयाबद्दल महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे अनिल बारकुल ,दत्तात्रय पवार,राजेंद्र बिक्कड,श्रीमती रोहिणी माने,प्रदिप म्हेत्रे ,श्रीमती जेमिनी भिंगारे,प्रशांत घुटे,उत्रेश्वर शिंदे,महादेव खराटे,पिराजी गोरे,विवेकानंद मिटकरी,श्रीमती राजश्री कुटे,श्रीमती वैशाली बांगर,श्रीमती सुरेखा पालकर यांनी स्वागत करुन संचालक मंडळाचे अभिनंदन केले आहे.