पदवीधर शिक्षक मतदार संघातुन जयसिंगराव गायकवाड, रमेश पोकळे व इतर कांही जणांनी उमेदवारी मागितली होती. परंतू त्यांना उमेदवारी न देता शिरीष बोराळकर यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे पक्षात नाराजी पसरल्याचे चित्र दिसत आहे,असे पत्रकारांनी विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांना विचारले असता दरेकर यांनी उमेदवारी वरून सर्वच पक्षात नाराजी नाटय असते, परंतू भाजपामध्ये उमेदवारीवरून नाराजी नाही, शिरीष बोराळकर यांच्या प्रचारासाठी पंकजाताई मुंडे ही आग्रेसर आहेत, अशी माहिती पत्रकार परिषदे मध्ये दरेकर यांनी दिली.
मराठवाडा पदवीधर मतदार संघातील भाजपाचे उमेदवार शिरीष बोराळकर यांच्या प्रचारार्थ विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर शनिवार दि. २१ नोव्हेंबर रोजी उस्मानाबादला आले होते. हॉटेल समर्थ येथे झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये अामदार राणाजगजितसिंह पाटील, भाजपाचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे, माजी अध्यक्ष दत्ता कुलकर्णी, अॅड.व्यंकट गुंड, सुधीर पाटील, नितीन भोसले, इंद्रजित देवकते, उपस्थित होते. पत्रकार परिषदेत बोलताना आ.दरेकर यांनी सरकार व पदवीधर पत्रकार संघातून दोन वेळेस निवडूण आलेले अामदार सतिश चव्हाण यांच्यावर कडाडून टिका करत आतापर्यंत चव्हाण यांनी माझे गांव व नातेगोत्याचेंच राजकारण केले आहे, असे सांगतले.
निष्क्रीय कारकिर्द
आ.दरेकर यांनी सतिश चव्हाण यांना पतदारांनी सलग १२ वर्ष संधी दिली आहे. ७ वर्ष ते सत्तेतील पक्षात होते. परंतू ठळक, असे एकही काम त्यांनी केले नाही. पदवीधर व बेरोजगारांची समस्या मांडली ना कांही विकासाचे प्रश्न मांडले. त्यामुळे त्यांची १२ वर्षांची कारकीर्द निष्क्रीय ठरली आहे, अशी टिका दरेकर यांनी केली. याउलट पदवीधर मतदार संघातून भाजपाचा उमेदवार निवडूण आल्यास आमचा दोन कलमी कार्यक्रम तयार आहे. जे पदवीधर नौकरीसाठी इच्छुक आहेत. त्यांना नौकरी मिळविण्यासाठी एक योजना तयार करण्यात आली आहे. तर जे पदवीधर स्वंयरोजगार अथवा उद्योग करू इच्छितात अशा बेरोजगार पदवीधरांसाठी शाश्वत कृती कार्यक्रम तयार करण्यात आला आहे. सध्याचे सरकार निष्क्रीय व गोंधळलेल्या परिस्थितीमध्ये असल्याचे सांगत आ.दरेकर यांनी शाळा चालु करायच्या का नाही, िवज बिले कमी करायचे का नाही, १०० युनिट मोफत द्यायचे का नाही, याबाबत सरकारची भुमिका गोंधळलेली आहे. ज्या वीज ग्राहकांनी वीज बिले भरलेली नाही, वीजबिले तपासून देण्यास सांगून सुध्दा वीजग्राहकांना नोटीसा देण्यात आल्या आहेत. ऊर्जामंत्री वीजबिलाची तपासणी करावी लागेल असे म्हणतात. त्यांनी मंत्री पदाचा राजीनामा देऊन एमएससीबी कार्यालयात बिले तपासणीचे कामे करावे, असा टोला ही दरेकर यांनी मारला. महाराष्ट्रात दुसरी लाट देत येत असताना शाळा सुरू करण्याची घोषणा मंुबई व ठाणे वगळता कांही जिल्हयात मंत्री करीत आहेत. तर कांही जिल्हयात कोरोनामुळे शाळा नको, असे सांगत आहेत. एंकदरीत सरकार गोंधळलेल्या स्थितीत आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या ५ वर्षांच्या काळामध्ये अनेक निर्णय घेतले व त्यांची अंमलबजावणी करून दाखविली. त्यामुळे या सरकारच्या विरोधात लोकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. बिहार व अन्य राज्याच्या निवडणुकीत माध्यमांचा सर्व अंदाज खोटा ठरवून भाजपाला निवडून दिले आहे, असेही दरेकर यांनी सांगितले.
