परिसरातील प्रकल्प भरलेले असतानाही पाणी उपलब्ध नसल्यामुळे दिवाळीत नागरिक हतबल झाले होते.त्यामुळे थेट ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकण्याचा इशारा देत रिकाम्या खुर्चीला निवेदन चिटकवण्याचे आंदोलन शिवसेनेच्या वतीने करण्यात आले होते. सदर आंदोलन शिवसैनिक शामसुंदर पाटील व अनिल बागल यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. या आंदोलनाची दखल घेत ग्रां.प.च्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी युध्दपाळीवर सदर पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी संबंधित यंत्रनेला सूचना दिल्या. त्यांनतर बेंबळी ग्रा.प.च्या कर्मचाऱ्यांनी मोठ्या मेहनतीने लिकेज काढून पाडव्याच्या शुभमुहूर्तांवर बेंबळी ग्रामस्थांना पाणीपुरवठा सुरळीत सुरू केला.
त्यांनतर शिवसेनेच्या वतीने बेंबळी ग्रामपंचायतचे सर्व कर्मचारी व प्रशासकीय अधिकारी यांचा सत्कार करण्यात आला. या सत्कार कार्याक्रमास उस्मानाबाद शिवसेनेचे कक्ष जिल्हाप्रमुख मोईन खान, शिवसैनिक आकाश पाटील, नाना पाटील, अनिल बागल, अब्दुला जमादार, सागर घंटे बाळू दाणे, हर्षल आगाशे, सुजित इंगळे, रसूल शेख व शिवसैनिक उपस्थित होते.
सत्कारमुर्ती
बेंबळी ग्रा.पं.चे प्रशासकीय अधिकारी देशमुख बी.एच. ग्रामविकास अधिकारी एम.बी. करपे, कर्मचारी कृष्णप्रसाद गावडे, निळकंठ रेडेकर, गौतम वाळवे, जुबेर सय्यद, उमेश लोकरे, राहुल दाणे व डॉ. सिध्दाप्पा ताडेकर यांचा ही भव्य सत्कार करण्यात आला.
