तुळजापूर / प्रतिनिधी- 

तिर्थक्षेञ तुळजापूरात मोकाट फिरणा-या  जनावरांचा  मालकांनी आपले जनावरे ताब्यात घेऊन त्याचा बंदोबस्त करावा अन्यथा कायदेशीर कारवाई करुनमोकाट जनावरे नगरपरिषद ताब्यात घेऊन त्यांची रवानगी गोशाळेत करण्यात येईल, असा इशारा मुख्याधिकारी अशिष लोकरे यांनी दिला आहे. 

तिर्थक्षेञ तुळजापूरात मोकाट  जनावरांचा प्रश्न गंभीर बनला असुन मोकाट जनावरे मालक आपले जनावरे दिवसा मोकाट शहरात सोडतात राञी ही जनावरे घरी येतात यामुळे जनावरांचा मालकांचा चा-याचा पैसा वाचतो माञ हे मोकाट जनावरे शहरातील प्रमुख रस्त्यावर ठाण मांडुन वाहतुकिस अडथळा आणीत आहेत या उपद्रवी जनावरांनमुळे आपघात होवुन तसेच लहान मुले,वृध्द महिला यांना  गंभीर इजा होवुन गंभीर दुखापत करण्याची शक्यता नाकारता येत नाही तरी मोकाट फिरणा-या जनावरांच्या मालकांनी आपले जनावरे आपल्या ताब्यात घेवुन त्यांचा बंदोबस्त करावा अन्यथा नगरपरिषद अधिनियम १९६५व मुंबई पोलिस कायदा १९५१ मधील तरतुदी नुसार कडक कारवाई करण्यात येइल व मोकाट जनावरे नगरपरिषद  पकडून त्यांची रवानगी गोशाळेत करण्यात येईल अशी माहीती मुख्याधिकारी अशिष लोकरे यांनी दिली

 
Top