वाशी / प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी विद्यालय वाशी येथील विद्यार्थी प्रसाद काकासाहेब गवारे याची पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ ५वी या परीक्षेत शिष्यवृत्तीधारक म्हणून निवड झाली आहे.कवडेवाडी शेतातील वस्तीवर जाऊन शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष दादासाहेब चेडे ,पर्यवेक्षक बापूसाहेब सावंत ,ज्येष्ठ शिक्षक डी. के. घुमरे यांनीनी पेढे भरवून त्याचा सत्कार केला.
याप्रसंगी काकासाहेब किसनराव गवारे, राणी काकासाहेब गवारे, किसनराव बळवंतराव गवारे , दादासाहेब किसनराव गवारे , अरुण किसनराव गवारे , पवनराजे कर्ण गवारे , नितीन मुरलीधर सुकाळे हे उपस्थित होते. ए. बी. डोके ,पी. ए. कांबळे, बी. एम. पवार, पी. एच. माने यांचे उत्कृष्ट मार्गदर्शन लाभले विद्यालयाचे मुख्याध्यापक डी.बी. कोकाटे, पर्यवेक्षक बापूसाहेब सावंत शिक्षक ,शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
