उस्मानाबाद / प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता ८ वी साठीच्या शिष्यवृत्ती परिक्षेत छत्रपती शिवाजी हायस्कुलच्या २० विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केले आहे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा आणि त्यांच्यातील बौद्धिक सुप्त गुणांना वाव मिळावा यासाठी सदरील परीक्षा घेतली जाते. छत्रपती शिवाजी हायस्कुलच्या विद्यार्थ्यांनी स्कॉलरशिपच्या उज्वल यशाची परंपरा ४० वर्षांपासून कायम ठेवली आहे.
२०२० मध्ये झालेल्या यावर्षीच्या परीक्षेत ओंकार बालाजी दंडनाईक याने सरासरी ८५.७२ टक्के गुण घेऊन जिल्ह्यात चौथा क्रमांक पटकावला. यासोबतच हर्षवर्धन संभाजी भोसले ८४.३४, कु. सिद्धी सुनील आंबेकर ८३.६७, सारंग सुधीर हराळे ८३.६७, स्वरूप बापू लोंढे ८१.६३, कु.श्रद्धा संतोष मसने ८२.३१, कु.समीक्षा रवी सुरवसे ८१.६३, अथर्व युवराज जाधव ८१.६३, सुमित शरद घोडके ८०.२७, कु.जान्व्ही नितीन ढगे ७९.५९, प्रफुल्ल प्रभाकर सुरवसे ७८.२५, निर्भय संजय देशमुख ७६.१९, कु.अक्षता राजेंद्र सुर्यवंशी ७५.५१, आदित्य संजय चव्हाण ७४.८२, कु.प्रणिशा सुभाष वीर ७३.४६, मनोज उत्तम शेंडगे ७२.७८, प्रदीप प्रभाकर भोसले ७२.१०, कु.श्रुती दत्तात्रय हाजगुडे ७२.१०, कल्पराज संतोष गोरे ७०.७४, विकास नितीन कांबळे याने ७०.७४ टक्के गुण मिळवले. सर्व विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत स्थान प्राप्त केले आहे. या गुणवंतांना सुहासिनी जाधव, प्रकाश देशमुख, आनंद वीर, उज्ज्वला शिंदे आदी शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या यशाबद्दल राजर्षी शाहू शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा शशिकलाताई घोगरे, उपाध्यक्ष अॅड. अविनाशराव देशमुख, कार्याध्यक्ष शिक्षणतज्ज्ञ एम.डी.देशमुख, संस्थासचिव भाई धनंजय पाटील, संस्था सदस्य निवृत्त न्यायमूर्ती संभाजीराव मुंडे पाटील, पंडितराव चेडे, निर्मलाताई भांगे यांच्यासह प्राचार्य आर.एस.देशमुख, उप प्राचार्य पी.एन. पाटील, पर्यवेक्षक एस.डी. गायकवाड, एन.एम.देठे यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन आणि कौतुक केले आहे.