उस्मानाबाद/ प्रतिनिधी

भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या प्रतिमेचे पूजन उस्मानाबाद जिल्हा परिषदेत करण्यात येउन त्यांना अभिवादन करण्यात आले.

  इंग्लंडच्या चाल्से मध्ये सर्वप्रथम 1856 मध्ये  बालदिन साजरा करण्यात आला. पंडित जवाहरलाल नेहरू अर्थात चाचा नेहरू यांना मुलांची आवड होती मुले ही देवाघरची फुले, अशी भावना त्यांनी जोपासली.त्यांच्या जयंतीनिमित्त यशवंतराव चव्हाण सार्वजनिक सभागृहांमध्ये उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अस्मिता कांबळे यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केला. 

  यावेळी सहाय्यक प्रशासन अधिकारी हजारे, गिरी,पिंपळे यांच्यासह स्वीय सहाय्यक प्रयाग वरिष्ठ सहाय्यक, भांडार विभाग  मधुकर कांबळे यांची उपस्थिती होती.


 
Top