तुळजापूर / प्रतिनिधी- 

रात्रीच्या वेळी शेतीला पाणी देण्यासाठी गेलेल्या सख्ख्या तिघा भावंडांचा विजेचा शाॅक लागून झालेल्या दुर्दैवी मृत्यूला राज्य सरकार जबाबदार असल्याचे तसेच ही हत्या असल्याचा आरोप करत शेतीसाठी दिवसा आणि उच्च दाबाने वीजपुरवठा करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. आठ दिवसांच्या आत मागणी मान्य न झाल्यास उग्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात निवेदनातून देण्यात आला आहे.

जालना जिल्ह्यातील पळसखेडे पिंपळे येथील जाधव कुटुंबातील तिघा सख्ख्या भावांचा रात्रीच्या वेळी शेतीला पाणी देण्यासाठी गेले असता विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याचा घटनेनंतर शेतकरी वर्गातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. तिघा भावंडांचा मृत्यू म्हणजे राज्य सरकारने केलेली हत्या असल्याचा आरोप करण्यात आला आहे. अशा हत्या रोखण्यासाठी राज्य सरकारने उपाययोजना करण्याची गरज व्यक्त करत शेती साठी दिवसा आणि उच्च दाबाने वीज पुरवठा करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने तहसीलदार मार्फत राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या कडे निवेदनाद्वारे केली आहे. आठ दिवसांचा आत उपाययोजना नाही केल्यास उग्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.


 
Top