लोहारा/प्रतिनिधी
अखिल भारतीय लिंगायत युवा मंच प्रणित बसव ब्रिगेड संघटनेच्या सोशल मीडिया आघाडीच्या उस्मानाबाद जिल्हाध्यक्षपदी पत्रकार गणेश खबोले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बसव ब्रिगेड संघटनेचे संस्थापक अध्यक्ष ऍड. अविनाश भोसीकर यांच्या मार्गदर्शनाखाली बसव ब्रिगेड सोशल मीडिया आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष कैलास वाघमारे,जिल्हा अध्यक्ष परमेश्वर पाटील यांनी पत्रकार गणेश खबोले यांना नियुक्तीचे पत्र दिले.
बसव ब्रिगेड संघटनेच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या सहाय्याने समाजाला संघटित करण्याचे तसेच समाजातील शेवटच्या समाजबांधवाला न्याय देण्याचे काम आपण करणार असल्याचे यावेळी पत्रकार गणेश खबोले यांनी सांगितले. खबोले यांच्या निवडीनंतर समाजातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, औद्योगिक अशा विविध स्तरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे तसेच त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात येत आहेत.
