उस्मानाबाद/ प्रतिनिधी

दीपावलीच्या निमित्ताने रामकृष्णहरी सत्संग मंडळ व संस्कार वर्गाच्या वतीने शहरातील पालावरची शाळा, वासुदेव गल्ली बोंबले हनुमान व सांजा चौक संभाजीराजे वसतिगृहातील निराधार मुलांना फराळाचे पदार्थ, आकाश कंदील तसेच बैठक चटईचे वाटप करण्यात आले.

प्रतिवर्षाप्रमाणे दिवाळीच्या पहिल्या दिवशी मंडळाच्या सदस्यांसोबतच संस्कार वर्गातील विद्यार्थ्यांनी भटक्या व निराधार मुलांना दीपावलीचा फराळ आणि गरजेनुसार लागणाऱ्या वस्तूंचे वाटप करण्यात आले.

याप्रसंगी अध्यक्ष प्रा. श्यामराव दहिटणकर, सचिव अनंतराव व्यास, सदस्य संतोष बडवे, नरसिंह जोशी, राहुल तुगांवकर, भालचंद्र शहापुरे, अनिल पाटील, संस्कार वर्ग सदस्य व विद्यार्थी सत्यहरी शेषनाथ वाघ, विशाखा बागल, सार्थकी वाघ, निकिता इंदापूरकर, वेदांती पाटील, कृष्णा इंदापूरकर उपस्थित होते.

 
Top