तुळजापूर / प्रतिनिधी-

  तिर्थक्षेञ तुळजापूरात अश्विनी अमावस्या व नरकचतुर्थी दिनी शनिवार दि. १४ रोजी सांयकाळी आगेची ज्वाला  खांद्यावरुन वाहुन नेला जाणारी  भेंडोळी संभळाच्या कडकडाटात तसेच आई राजा उदो -उदो सदानंदीचा उदो-उदो,  कालभैरव टोळभैरवाचा चांगभलेच्या गजरात पारंपारिक पध्दतीने काढण्यात आली.

कोरोना पार्श्वभूमीवर श्रीतुळजाभवानी मंदीर भाविकांनसाठी प्रवेश बंद असल्याने मोजक्याच लोकांच्या उपस्थीत हा उत्सव पार पडला. कोरोना पार्श्वभूमीवर अश्विनी अमावस्या व नरक चतुर्थी दिनी श्रीतुळजाभवानी मातेचे दर्शन कालभैरव, टोळभैरव यांचे दर्शन भाविकांनी दूरनच घ्यावे लागले.

भेंडोळी दुपारी तयार करण्यात आल्यानंतर कालभैरव मंदीरात सांयकाळी कालभैरव आरती केल्यानंतर ती देविच्या पोताने प्रज्वलीत केली  गेली नंतर  ही भेंडोळी मानकरी, देवीभक्त मंडळीनी  लाकडाचा पुढे व मागे खांद्यावरुन कालभैरव मंदीरातुन  खड्या ती पायऱ्या उतरुण ती मठांन जवळ आल्यानंतर येथे मंहत वाकोजीबुवा गुरु,  तुकोजीबुवा व मंहत हमरोजी  यांनी भेडोळीवर तेल व पाणी ओतुन पुजन केल्यानंतर ती वळण असलेल्या अरुंद सव्वाफुट बोळातीन, शिवाजी दरवाजा मार्ग देवी मंदीरात सिंह गाभाऱ्यात आणली गेली. श्रीदत्त मंदीराजवळ येताच येथे मंहत मावजीनाथबुवांनी पुजन केले. नंतर ती मंदीर प्रांगणात प्रदक्षणा मारुन होमकुंडासमोर गोल प्रदक्षणा मारुन  निंबाळकर दरवाजा राजेशहाजीमहाध्दार मधुन महाध्दार रोड आर्य चौक ते कमानवेस येथील मारुती मंदीरात पोहचले तिथे क्षिरसागर कुंटुंबियाचा वतीने  विधीवत पुजाअर्चा करुन ती प्राचीन आहिल्या देवी होळकर विहीरीतील प्रविञ जलाने शांत (विझवली) केली  गेली.

नरक चतुर्दशीनिमित्त अभ्यंगस्नान

दरम्यान नरक चतुर्दशीनिमित्त शनिवारी पहाटे तुळजाभवानी मातेला सुवासिक तेल, चंदन आदीसह गरम पाण्याने अभ्यंगस्नान घालण्यात आले. यावेळी देवीचे महंत, पुजारी, सेवेकरी उपस्थित होते. तर सायंकाळच्या अभिषेक पूजेला भेंडोळीनंतर प्रारंभ करण्यात आला.

 
Top