उस्मानाबाद / प्रतिनिधी-

पदवीधर मतदार नाव नोंदणी करून ही  मतदारांचे नांव यादीमध्ये  समाविष्ट नाही. यामुळे  सर्व आवश्यक कागदपत्रे देवून नांव नोंदणी केलेला मतदार मात्र ऐन निवडणुक कार्यक्रमाच्या वेळी संभ्रमात आहे. कधी नव्हे ते जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात नांव नोंदणी झालेली असून पदवीधर निवडणुकीसाठीचा मतदाराचा टक्का देखील वाढलेला आहे. परंतु यामुळे वाढलेल्या टक्केवारीत मात्र घट होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. त्यामुळे आपण या संदर्भात तात्काळ लक्ष घालून योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी युवा सेनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. 

जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,  पदवीधर मतदार नाव नोंदणीचा प्रत्यक्ष कार्यक्रम सुरु असताना उस्मानाबाद तहसिल तसेच  उस्मानाबाद जिल्ह्यातील इतर तहसील कार्यालयामध्ये  मतदारांनी स्वत: तसेच विविध राजकीय व सामाजिक संघटनांच्या माध्यमातून नावनोंदणी केलेली आहे. त्यासाठी विहित नमुन्यात सर्व आवश्यक कागदपत्रांसह मतदार नावनोंदणीसाठी अर्ज दाखल केलेले आहेत. तरीही बऱ्याच मतदारांची नावे ही नोंदवण्यात आली गेलेली नाहीत. कारण चिफ इलेक्टोरल ऑफिसर, महाराष्ट्र (मुख्य निवडणुक अधिकारी, महाराष्ट्र) यांच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मतदारांनी नांव सर्च केले असता त्यांना Record Not Found (s) असे पहावयास मिळत असल्यासंदर्भातच्या तक्रारी प्राप्त  झालेल्या आहेत. यामुळे  सर्व आवश्यक कागदपत्रे देवून नांव नोंदणी केलेला मतदार मात्र ऐन निवडणुक कार्यक्रमाच्या वेळी संभ्रमात आहे. कधी नव्हे ते जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात नांव नोंदणी झालेली असून पदवीधर निवडणुकीसाठीचा मतदाराचा टक्का देखील वाढलेला आहे. परंतु यामुळे वाढलेल्या टक्केवारीत मात्र घट होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. त्यामुळे आपण या संदर्भात तात्काळ लक्ष घालून योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी करण्यात आली आहे. 


 
Top