तुळजापूर / प्रतिनिधी-
श्री तुळजाभवानी मातेच्या महाद्वारासमोर श्रीतुळजाभवानी मातेची संभळाचा कडकडाटात आरती करुन
“मदीराचे नको तर भक्ती चे दार उघड !
दारूचे नको तर श्रध्देचे दार उघड !! उध्दवा दार उघड !!!
असा जागर याचना करीत मुख्यमंत्री ठाकरे यांना राज्यातील मंदीरांचे दारे उङडे करण्यासाठी देविने सदबुध्दी द्यावी असे साकडे घालत मंदीराचे दारे जो पर्यत ठाकरे सरकार उघडण्याचा निर्णय जाहीर केला जात नाहीव प्रतिनिधीक स्वरुपात साधुसंतान दर्शन दिले जात नाही तोपर्यत हे ठिय्या आंदोलन मागे घेणार नसल्याचा इशारा यावेळी भाजपा अद्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी यावेळी दिला.
महाराष्ट्राची कुलस्वामीनी श्रीतुळजाभवानी मातेचे मंदीर खुले करण्यासाठी भाजपा अधात्मिक आघाडीचा वतीने गुरुवार दि5रोजी श्रीतुळजाभवानी मंदीर समोर राज्यातील मंदीरे सुरु करण्यासाठी साधुसंत पुजारी भक्तवृदांनी ठिय्या आंदोलनास आरंभ केला.यावेळी श्रीतुळजाभवानी परिसरात प्रचंड पोलिस बंदोबस्त तैनात केला होता.मंदीर परिसरास अक्षरशा छावणीचे स्वरुप प्राप्त झाले होते. यावेळी या ठिय्या आंदोलनात सोशल डिस्टंन्स पाळत ५० साधु-संत, पुजारी, व्यापारी , भक्त व भाजपाचे मंडळी सहभागी झाले होते.
यावेळी बोलताना भाजपा अद्यात्मिक समन्वय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले म्हणाले कि महाराष्ट्रातील मंदीरे सुरु करण्यासाठी शासनाकडे निवेदन देवुन आंदोलन केले. पण संवेदना हीन महाआघाडी सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले.मंदीरे उघडे करण्या बाबतीत आम्ही साधुसंताशी मुख्यमंत्री उदव ठाकरे यांनी चर्चा करावी असे आवाहन केले होते.पण सरकार साधुसंताशी चर्चा केली नाही ते साधुसंताला घाबरले, शेवटी आमच्या व्यथा कुठे मांडायाचा म्हणून आम्ही देवीदारी आलो व तिलाच आता विनंती करतो कि दार उघड बये दार उघड .
मंदीराचे दारे या सरकारने लावली आहेत भक्तांना देविदर्श न घेण्याची इछा आहे. यात अडथळा ठाकरे सरकार आणत आहे.निवडणुका आल्या की, जयभवानी म्हणायाचे व तिचेच दारे बंद ठेवायाचे हा कुठला न्याय असा सवाल यावेळी केला सरकारने सर्व सुरु केले आजपासुन तर स्विमिंग पुल चिञपट गृह सुरु केले येथे कोरोना पसरत नाही का मग मंदीरात दोन मिनिटे दर्शन घेतले की कोरोना होतो का असा सवाल यावेळी केला.यावर चर्चा करण्यासाठी साधुसंतान बरोबर एक तास लाईव्ह चर्चा करावी, असे आवाहन ठाकरे यांना यावेळी दिले. देव भक्तांचा आड येणारे हे सरकार आहे.भक्त व देव लवकर एकरुप व्हावे यासाठी मंदिर सुरु करावे, असे यावेळी म्हणाले
या आंदोलनाची दखल मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी घ्यावे व गेली ७ महिन्या पासुन बंद असलेले राज्यातील मंदीरे भक्तांनसाठी खुले करावे, असे स्पष्ट करुन जो पर्यत मंदीर खुले केले जात नाही तोपर्यत हे ठिय्या आंदोलन चालुच राहणार असल्याचे यावेळी स्पष्ट केले. यात आ. राणाजगजितसिंह पाटील , जिल्हाध्यक्ष नितीन काळे, नगराध्यक्ष सचिन रोचकरी , विनोद गंगणे, आनंद कंदले संतोष बोबडे सह साधुसंत पुजारी, व्यापारी, भाजपा पदाधिकारी मोठ्या संखेने उपस्थित होते.
