भारतीय जनता पार्टीच्या वतीने मंदिरे उघडण्यासाठी राज्यभर आंदोलने करण्यात आली होती.या आंदोलनाची दखल घेऊन महाराष्ट्र राज्य सरकारने नियम व अटी घालून सर्व धार्मिक स्थळे मस्जीद-मंदिरे खुली करण्यास परवानगी दिल्याने परंडा येथील श्रीराम मंदिर व प्रसिद्ध हजरत ख्वाजा बद्रोद्दीन चिश्ती दर्गाह भक्तांसाठी खुले करण्यात आल्याने दि.१६ सोमवार रोजी सकाळी मंदिर व दर्गाह येथे भाजपाच्या कार्यक्रत्यानी पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
यावेळी तालुकाध्यक्ष राजकुमार पाटील, प्रदेश अल्पसंख्याक चिटणीस ॲड.जहीर चौधरी, नगरसेवक अन्वर लुकडे, गणेश राशनकर, समिर पठाण, कांतीलाल पाटील, उमाकांत गोरे, अभयसिंह देशमुख, संदिप शेळके, प्रमोद लिमकर, सागर पाटील, बाळासाहेब गोडगे, अतुल जाधव, राहुल जगताप, धनंजय डवरी, रसुल पालकर सह आदी पदाधिकारी,कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
