भारतीय स्टेट बँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था उस्मानाबाद अंतर्गत परंडा तालुक्यातील मौजे भोंजा हवेली येथे उमेद व माविम समूहातील महिलांना दुग्ध व्यवसाय व गांडूळखत-नाडेफ प्रशिक्षणाचा मास्क, किट,वही पेन,उद्योजकता बुक देऊन हा समारंभ दि.१९ गुरुवार रोजी पार पडला.
जिल्हा समन्वयक विकास गोफणे यांनी विविध योजनेची सविस्तर माहिती दिली.व होतकरू गरजू महिलांनी ग्रामीण भागातील शेती आधारे जोड व्यवसाय व शासनाच्या विविध योजनेचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा तसेच लघुउद्योग सल्लागार गणेश नेटके यांनी शेळीपालन, दुग्धव्यवसाय, गांडूळखत, कुक्कटपालन, रेशीम उद्योग करून कुटुंबाला हातभार लावावा गटातील महिलांच्या सहकार्याने उतुगं भरारी घ्यावी असा उपस्थितांना सल्ला दिला.
यावेळी उपस्थित SBIRSETI समन्वयक विकास गोफणे, उमेद चे लघुउद्योग सल्लागार गणेश नेटके, लघुउद्योग सल्लागार गणेश चव्हाण, अनिल पवार, सूर्यकांत नेटके,जोत्सना कोळी, प्रेरिका पल्लवी सावंत, प्रियंका मुळीक,अर्चना पोळके व समुहातील महिलां उपस्थित होत्या.
