परंडा/प्रतिनिधी : - 

येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष हाजी वाजीद दखनी यांचे चिरंजीव राज दखनी या गुणवंत विद्यार्थ्यां ने आय.टी इन डिप्लोमा मधील शेवटच्या वर्षात ९३% गुण मिळवल्या बद्दल  मंडई भिमनगर च्या वतीने नगराध्यक्ष जकीर भाई सौदागर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

 यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष राहुल बनसोडे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष हाजी वाजीद दखनी, राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे शहराध्यक्ष अजय बनसोडे, भूपेंद्र बनसोडे, अक्षय चौथमहल, सुमित बनसोडे, आनंद चौथमहल , अमित जोशी,  राजा भाऊ शिंदे, बबलू वाघचौरे, अमर पालखे, भूषण बसवंत, भास्कर ढगे, पै.दादा माळी,अजय चौथमहाल आदी उपस्थित होते.


 
Top