कोरोना पार्श्वभूमीवर भाविकांनसाठी तब्बल आठ महिन्यापासुन बंद केलेले मंदीरांचे दरवाजे आता दिपावली पाडव्या दिनी खुले केले जाणार असल्याने भक्तांनसह मंदीरावर अवलंबून असणाऱ्या व्यापारी पुजारीवर्गासाठी हा निर्णय दिलासा देणारा व देविदर्शनासाठी आसुसलेल्या भाविकांनसाठी व व्यापारी, किरकोळ विक्रेते, पुजारी वृंदासाठी शासनाची दिवाळी सुखद भेट मानली जात आहे.
नरक चतुर्थी दिनी हा निर्णय मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी जाहीर केल्याने तिर्थक्षेञ तुळजापूर पंचक्रोषीत या निर्णयाचे स्वागत केले जात आहे. कोरोना पार्श्वभूमीवर श्रीतुळजाभवानी मंदीर दि. १७ मार्च रोजी भाविकांनसाठी बंद केले होते ते तब्बल आठ महिन्यानंतर सोमवार दि. १६ रोजी दिपावली पाडव्याचा शुभमुहुर्तावर भाविकांनसाठी खुले केले जाणार आहे.
श्री तुळजाभवानी मंदीर भाविकांनसाठी खुले करावे म्हणून भाजपासह हिंदुत्ववादी संघटना, सामाजिक संघटना, पक्ष यांनी आंदोलन केले होते. भाजपाने तर तिर्थक्षेञ तुळजापूर मंदीर उघडण्यासाठी आंदोलन करण्याचे कुरुक्षेञ बनवले होते.आ राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनखाली लाक्षणिक उपोषण, ढोल बजाओ, ठिय्यासह विविध आंदोलन केले होते. भाजपा अद्यात्मिक आघाडीचा वतीने साधुसंतांनी ठिय्या आंदोलन केले होते. विशेष म्हणजे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे , पालकमंञीसह अन्य मंञी छञपती संभाजी महाराज यांनी ही महाध्दार मधुन दर्शन घेतले होते.अनेक मोठे उत्सव भाविकांनविना साजरे करावे लागले होते . शहरातील बाजार पेठ गेली आठ महिन्या पासुन कोमात असल्या सारखी होती. माञ आता कोमातुन ती जोमात येणार आहे.
या निर्णयाचा सर्वाधिक लाभ तिर्थक्षेञ तुळजापूरातील प्रत्येकांना होणार आहे. मंदीर खुले होणार असल्याने भाविक एकदम मोठ्या संखेने येण्याची शक्यता असल्याने शासन भाविकांना थोड्या थोड्या संखेने दर्शन देण्याची शक्यता आहे. माञ शासनाच्या अटी व शर्ती काय असणार याकडे भाविकांनसह शहरवासियांचे लक्ष लागले आहे.
----------------------------------
नियमांचे पालन होणार
शासनाच्या निर्णय प्रमाणे अटी व शर्तीचे पालन करुन मंदीर सर्वांच्या आरोग्याची सुरक्षा घेत खुले केले जाईल
- तहसिलदार तथा प्रशासकीय अधिकारी सौदागर तांदळे
---------------------------------
अत्यानंदाची गोष्ट -
श्रीतुळजाभवानी मंदीर उघडणे तुळजापूरवासियांनसाठी अत्यानंदाची गोष्ट असुन तिर्थक्षेञ तुळजापूर येथील थांबलेले अर्थचक्र आता सुरु होईल. या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. यासाठी आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनखाली आम्ही आंदोलन केले. शासनाने आमच्या आंदोलनाची दखल घेतली.
नगराध्यक्ष तथा विश्वस्त सचिन रोचकरी
