परंडा / प्रतिनिधी 

 जिल्ह्यात सर्वात मोठे असलेले सीना - कोळेगाव प्रकल्प हे स्पटेंबर महिना व गेल्या दोन दिवसा पासून पाऊसाने दमदार हजेरी लावल्याने सीना कोळेगाव प्रकल्प १०० टक्के भरण्याच्या मार्गावर असल्याने पाटबंधारे विभागाने धरण परिसरातील ग्रामस्थांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.

 तालुक्यातील खासापूरी,चांदणी,पांढरेवाडी,हे मध्यम प्रकल्प भरून सांडव्या द्वारे पाणी वाहत आहे.तसेच खंडेश्वर प्रकल्प पूर्ण समतेने भरले होते.मात्र माती भिंतीच्या भरवाला मोठे व लांब भेगा पडल्याने धोका टाळण्यासाठी काही दिवसा पूर्वी सांडवा पोकलॅन द्वारे फोडून पाणी नदी पात्रात सोडण्यात आले होते.तर साकत मध्यम प्रकल्प, आनाळा साठवण तलाव अद्याप भरलेले नाही. गेल्या दोन दिवसा पासून पाऊस दमदार पडत असल्याने प्रकल्पात मिळणारे पाणी वाढण्यास सुरवात झाली आहे. त्यामुळे सीना - कोळेगाव प्रकतप भरण्याच्या मार्गावर आहे.म्हणून धरण परिसरातील ग्रामस्थांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे. 

 सीना - कोळेगाव प्रकल्पाची क्षमता१५०.४९ दलघमी इतकी आहे. निम्नखैरी पांढरेवाडी मध्यम प्रकल्पाची १०.५६  दलघमी तर खासापूरी मध्यप प्रकल्प १३.५९० दलघमी क्षमता, साकत मध्यम प्रकल्प१४.४९० दलघमी क्षमत्तेचा आहे.तर चाँदणी मध्यम प्रकल्प२३.७८० दलघमी तर खंडेश्वरवाडी मध्यम प्रकल्प१०.८००दलघमीक्षमतेचाआहे.यातील साकत मध्यम प्रकल्पात अद्याप पर्यंत मुबलक पाणी साठी नाही.तसेच आनाळा येथील साठवण तलावतही अत्यल्प पाणी साठा असल्याने सीना - कोळेगाव प्रकलातील पाणी साकत मध्यम प्रकल्प व आनाळा साठवण तलावात उपसा सिंचनाद्वारे सोडण्याची मागणी परिसरातील शेतकरी करित आहे.

 
Top