उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

उस्मानाबाद येथील दूरदर्शन व आकाशवाणीचे  जिल्हा प्रतिनिधी देविदास पाठक यांनी कोरोना संक्रमणाच्या काळात उत्कृष्ट वार्तांकन करून समाजात जनजागृती करून कोरनाचा वाढत चाललेला कहर वाढू नये म्हणून दूरदर्शन व आकाशवाणीच्या माध्यमातून विशेष प्रयत्न करून समाजाला जागृत ठेवण्याचं काम त्यांनी केलं त्याबद्दल प्रसारभारतीचा देशपातळीवरील उत्कृष्ट बातमी पुरस्कार मिळाल्याबद्दल तसेच यापूर्वी त्यांना 2011साली  देखील पुरस्कार मिळाला होता या दोन्ही चे औचित्य साधून रुईभर  ग्रामपंचायतच्या वतीने त्यांचा रविवारी दि.11रोजी शाल श्रीफळ फेटा पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला .

यावेळी भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे पुर्व मराठवाड़ा  संपर्कप्रमुख रामदास कोळगे, सरपंच दत्तात्रय कस्पटे, उपसरपंच बालाजी कोळगे, ग्रामसेवक प्रदीप कुंभार, राजा भणगे, किशोर कोळगे,  राजकुमार लोमटे, धनंजय चव्हाण, राजेंद्र गव्हाणे, अशोक गव्हाणे शंकर चव्हाण, अशोक सिरसाठे, पोपट आगळे इत्यादी सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर होते.

 
Top