उस्मानाबाद / प्रतिनिधी

येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या संस्थामाता सुशिलादेवी साळुंखे यांची आज २२आॅक्टोंबर रोजी जयंती साजरी करण्यात आली यावेळी प्र.प्राचार्य प्रा.डाॅ.ए.बी.इंदलकर यांनी संस्थामाता सुशिलादेवी साळुंखे यांच्या प्रतिमेचे पुजन केले.

यावेळी संस्थामाता सुशिलादेवी साळुंखे यांनी शिक्षणमहर्षी डाॅ.बापूजी साळुंखे यांना संस्थेच्या उभारणीत कसे सहकार्य केले यासंबंधित प्रा.डाॅ.सौ.महाडिक मॅडम व प्रा.डाॅ.ए.बी.इंदलकर यांनी आपली मनोगते व्यक्त केली यावेळी उपप्राचार्य प्रा.बबन सूर्यवंशी व महाविद्यालयातील शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी व सेवक उपस्थित होते आभार प्रा.के.एम.क्षीरसागर यांनी मानले


 
Top