उस्मानाबाद / प्रतिनिधी-
उत्तरप्रदेश मधील हाथरस येथील 19 वर्षीय युवतीवरती सामूहिक बलात्कार करून तिच्यावर अत्याचार केल्याने तिचा मृत्यू झाला तेव्हा सुरक्षा रक्षकांकडून तिचा मृतदेह घरच्या कुणालाही कल्पना न देता जाळण्यात आला. अतिशय घृणास्पद, क्लेशदायक असे कृत्य वारंवार आपल्या देशात होत आहे. असा गुन्हा करणाऱ्या आरोपींना भर चौकात फाशीची शिक्षा द्यावी. अशा मागणीचे निवेदन राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी युवक जिल्हा प्रभारी प्रशांत बाबर, युवक जिल्हाध्यक्ष आदित्य गोरे, युवक प्रदेश सरचिटणीस प्रशांत कवडे,युवक प्रदेश सरचिटणीस तारेख मिर्झा,युवक प्रदेश कार्यकारिणी सदस्य शंतनु खंदारे,सुहास बारकुल आदींची उपस्थित होती.