संवाददाता । कलंब 

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना आता शहरात डासांनी उच्छाद मांडला आहे.या पार्श्वभूमीवर नगरपालिकेने सावध राहून उपाययोजना करण्याची गरज निर्माण झालीआहे.डेंग्यूसदृश्य आजाराचे थैमान पसरल्यावर पालिका लक्ष देणार का असे सवाल शिवसेनेचे तालुका प्रमुख तथा गट नेते शिवाजी आप्पा कापसे यांनी केला असून, मुख्याधिकारी यांना निवेदन ही देण्यात आले आहे. 

दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, सध्या पावसाचा जोर कमी झाल्यामुळे डासांचा उच्छाद मोठ्या प्रमाणात वाढला आहे.नगरपालिकेकडून अध्यापही प्रतिबंधात्मक फवारणी केली नसल्याने नागरिकांच्या आरोग्याला धोक्या निर्माण झाला आहे.या गंभीर प्रश्नाकडे सत्ताधारी मंडळींचे दुर्लक्ष झाल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.त्यातच डासांचे मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. बाहेर जावे तर कोरोना ची भीती आणि .घरात बसावे तर डांसाचा डंक सहन करावा लागत आहे. यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना परिणामी डेंगी, मलेरियासारख्या साथीच्या रोगाचे रुग्ण वाढले आहेत.त्यामुळे शहरातील साथरोगाचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे..वाढत्या डासांच्या उच्चदामुळे सर्वसमान्यचे जगणे हैरान झाले असताना पालिका प्रशासन याकडे गांभीर्याने पहाण्यास तयार नाही.शहरातील बहुतांश भागातील नल्या सफाई केल्या नाहीत. घंटा गाडी फिरत नाही,शुद्ध पाण्याचे फिल्टर तत्काळ सुरू करण्यात यावे, दररोज नळाला पणी सोडण्यात यावे, अशी ही मागणी करण्यात आली आहे. नगरपाकिकेला फवारणी करण्यास वेळ मिळत नाही का?साथरोग पसरण्याची वाट बघायची का, असाही सवाल उपस्थित करण्यात आला आहे, प्रतिबंधात्मक फवारणी तात्काळ करावी अशी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे. यावर तालुका प्रमुख शिवाजी आप्पा कापसे, शहर अध्यक्ष प्रदीप मेटे,नगरसेवक मुस्ताक कुरेशी,सतीश टोणगे,अनंत वाघमारे, भागवत चोंदे , प्रताप मोरे,रोहन पारख,अजित गुरव,गोविंद चौढरी,गजानन चोंदे,डॉ.रुपेश कवडे,श्याम नाना खबाले,संजय घुले,लक्ष्मण हुळजुते,किरण राजपूत,प्रताप शिंदे,अतुल कवडे, मंदार मुळीक,सचिन शिनगारे,बबलू चोंदे, आकाश चोंदे,नामदेव पौळ , शंकर खंडागळे, सुलेमान मिर्झा , अनिल पवार, राजाभाऊ गरड आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.


 
Top