उस्मानाबाद/ प्रतिनिधी

औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघाची निवडणूक 2020 चा कार्यक्रम नजीकच्या काळात जाहिर होणार आहे.त्या दृष्टीने सदर निवडणुकीसाठी उस्मानाबाद जिल्ह्यातील मतदान केंद्र व सहाय्यकारी मतदान केंद्रासह 74 मतदान केंद्रांचे ठिकाण, मतदान केंद्र स्थित असलेल्या इमारतीचे नाव,मतदान केंद्राची व्याप्ती निश्चित करण्यात आलेली आहे.

 औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघाची निवडणूक 2020 साठी निश्चित करण्यात आलेल्या मतदान केंद्रांची यादी जिल्हाधिकारी कार्यालय,उपविभागीय अधिकारी कार्यालये,तहसील कार्यालये यांचे नोटीस बोर्डावर दिनांक 06 ऑक्टोबर-2020 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर परीक्षणासाठी तसेच मतदारांना पाहण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

 प्रारूप मतदान केंद्राची यादी प्रसिद्ध झालेल्या दिनांकापासून 7 दिवसापर्यंत (म्हणजेच दिनांक 13 ऑक्टोंबर 2020 पर्यंत) हरकती व सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी,उस्मानाबाद यांचे कडे सादर करता येणार आहेत.

 प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदान केंद्राच्या यादीमधील मतदान केंद्राचे ठिकाण,मतदान केंद्र स्थित असलेल्या इमारतीचे नाव, मतदान केंद्राची व्याप्ती इत्यादी बाबत हरकती व सूचना असल्यास जिल्हाधिकारी कार्यालय उस्मानाबाद यांचेकडे दिनांक 13 ऑक्टोंबर 2020 पूर्वी सादर कराव्यात. असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी,कौस्तुभ दिवेगावकर यांनी कळविले आहे. 

 
Top