तुळजापूर  प्रतिनिधी

 श्री तुळजाभवानी मातेचा  शारदीय नवराञोत्सव यंदा  कोरोना पार्श्वभूमीवर भाविकाविना पार पडला जाणार असला तरी  धार्मिक विधी होणार असल्याने परंपरे प्रमाणे  प्रशासनासह शहरवाशिय पुर्व  तयारीत गुंतले आहेत. परंतु व्यापारी वर्ग माञ तयारी करावी की, नाही या संभ्रमावस्थेत दिसत आहे.

यंदा शारदीय नवराञोत्सव कोरोना कालावधीत असल्याने आरोग्य विभागावर ताण असणार आहे. भाविकविना हा शारदीय नवराञोत्सव संपन्न  होणार असल्याने मंदीर प्रशासनातील अधिकारी वर्गास थोडसा दिलास मिळाला आहे. श्री तुळजाभवानी मंदीर प्रशासन दर्शन मंडपसह मंदीर परिसरात डागडुजी करुन घेत आहे. नगरपरिषद ही पूर्वतयारी कामे करीत आहे. शहरवाशिय पुजारी वर्ग घर साफसफाई धुणे -भांडे करण्यात मग्न आहे.

श्री तुळजाभवानी मंदीर संस्थान ने कोरोना पार्श्वभूमीवर पुजारी, सेवेकरी,  मानकरी यांची संख्या निश्चित करण्याचे काम केले असुन मंदीरात धार्मिक विधीसाठी लागणारे साहित्य संकलन,  किरकोळ दुरुस्ती कामे सुरु केले आहे. श्रीतुळजाभवानी मातेच्या शारदीय नवराञोत्सवात भाविकांनसाठी सर्वाधिक आकर्षण असणाऱ्या राजेशहाजीमहाध्दार वरील  आकर्षक विद्युत रोषणाई करण्याचा कामास आरंभ केला आहे. 

 
Top