लोहारा / प्रतिनिधी- 

 मंदिरासमोर खेळत असताना अकरा वर्षीय शाळकरी मुलीला निर्जनस्थळी नेवून चार नराधमांनी तिच्यावर सामूहिक दुष्कर्म केल्याची घटना लोहारा तालुक्यातील सास्तूर येथे घडली. तीन दिवसानंतर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून चारजणांना ताब्यात घेतले आहे. त्यातील तीन आरोपी अल्पवयीन आहेत. जखमा आणि रक्तस्त्राव झाल्यामुळे बेशुध्द अवस्थेत असलेल्या पीडितेला तीन दिवसांपूर्वीच लातूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तिच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून तिसऱ्या दिवशी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

तालुक्यातील सास्तूर गावातील मजूर कुटुंबातील अकरा वर्षीय मुलगी एका मंदिरासमोर खेळत होती. गुन्ह्यातील आरोपींनी तिला गोड बोलून निर्जनस्थळी नेले व तिथे तिच्यावर सामूहिकरित्या दुष्कर्म केले. ही बाब आरोपींच्या दबावामुळे मुलीने घरी लागलीच सांगितली नव्हती. मात्र तिला पोटदुखी आणि रक्तस्त्रावाचा त्रास सुरू झाल्याने आईवडिलांनी विचारपूस केल्यानंतर पीडित मुलीने सर्व हकिकथ कथन केली. त्यानंतर मुलीच्या कुटुंबियांनी लोहारा पोलीस ठाण्यात जबाब देण्यात आला. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी अत्याचार झाला होता, मात्र जबाब आणि तक्रार न दिल्याने गुन्हा नोंदविण्यात उशीर झाल्याची माहिती आहे. पीडितेचे आई-वडील शेतमजूर आहेत. मुलीला त्रास सुरू झाल्यानंतर तिला सास्तूर येथील दवाखान्यात प्राथमिक उपचार करुन होल उपचारासाठी लातूरला पाठविण्यात आले असून तेथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

पोलिसांनी आरोपींविरूध्द गुन्हा दाखल करून चारही आरोपींना तत्काळ अटक केले आहे. चारही आरोपी अल्पवयीन आहेत. दरम्यान, लातूरमधील औशाचे भाजप आमदार अभिमन्यू पवार यांनी पीडितेची दवाखान्यात जाऊन भेट घेतली. त्यांनी तिच्या आईवडिलांना धीर देण्याचा प्रयत्न केला.


 
Top