उस्मानाबाद / प्रतिनिधी-   

के . टी . पाटील औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयात दिनांक १५ आक्टोंबर २०२० रोजी जागतिक विद्यार्थी दिन उत्साहात साजरा करण्यात आला .

सदर कार्यक्रमाची सुरूवात डॉ. ए. पी.जे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पुजन डॉ. आमेर काझी यांच्या हस्ते करून करण्यात आले. या वेळी त्यांनी सांगितले की, भारताचे ११ वे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम यांच्या जयंती निम्मित “जागतिक विद्यार्थी दिन” म्हणुन साजरा करण्यात येतो. तसेच त्यांनी सांगितले की, Education is the most powerful weapon which you can use to change the world असे डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांनी अनुभवातुन सांगितले होते म्हणुनच हा दिवस “वाचन प्रेरणा दिन” म्हणुन जगभरात साजरा करण्यात येतो.

सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अमोल जोशी, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. अतुलकुमार अलकुंटे , प्रा . रूबीया काझी व प्रा. खरे शिवरत्न तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.

 
Top