उस्मानाबाद / प्रतिनिधी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठा तर्फे घेण्यात येणाऱ्या विधी अभ्यास क्रमाच्या पदवी परीक्षा दि.09  ते 18 ऑक्टोबर  दरम्यान होणार आहेत. तेंव्हा कुठल्याही विद्यार्थ्याला  कोरोना संसर्गाचा धोका उद्भवू  नये यासाठी खबरदारी म्हणून आवश्यक उपायोजना करण्यासाठी डॉ. बापूजी साळुंखे विधी महाविद्यालयाचे प्राचार्य श्री.कठारे सर, डॉ.व्ही.जी शिंदे, व युवासेनेचे जिल्हा समन्वयक अॅड. संजय भोरे  यांनी धाराशिव नगर पालिकेचे नगराध्यक्ष मा. मकरंदराजे निंबाळकर यांची भेट घेतली. 

यावेळी विधी महाविद्यालयाचे प्राचार्य मा. कठारे सर यांनी नगराध्यक्ष मकरंदराजे निंबाळकर यांना नगर पालिके कडून दररोज सकाळी परिक्षा हॉल सॅनिटाईज करुन देण्यात यावेत. तसेच विद्यार्थ्यांना हात स्वच्छ धुण्यासाठी हँडवॉश स्टेशन देखील बसविण्याची विनंती केली. यावेळी नगराध्यक्ष यांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या हेतूने नगर पालिकेकडून सर्व तोपरी मदत करण्यात येईल असे सांगून महाविद्यालय प्रशासनास कोव्हिड 19 संदर्भात लागणाऱ्या सर्व बाबींची पूर्तता करण्यासंदर्भात नगर पालिका प्रशासनास सुचना दिल्या. 


 
Top