उमरगा / प्रतिनिधी

 केंद्र सरकारच्या कृषी सुधारणा विधेयकाला महाराष्ट्र सरकारने स्थगित दिले बाबत निषेध व्यक्त करत उमरगा भाजपच्या वतीने तहसीलदार यांना बुधवारी निवेदन देण्यात आले.तसेच महाराष्ट्र सरकारच्या स्थगिती आदेशाची राष्ट्रीय महामार्गावर होळी करून सरकार विरुद्ध घोषणाबाजी करत निषेध व्यक्त करण्यात आला.

 मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने कृषी सुधारणा विधेयक २०२० देशभरात लागु केले आहे. या विधेयकामुळे शेतकऱ्यांना चांगले दिवस येणार आहेत. शेतकऱ्याला आपला माल कोठेही विकण्याची मुभा या विधेयकात केलेली आहे. त्याचबरोबर केंद्र सरकारचे हमीभाव खरेदी पुर्वीप्रमाणेच चालु ठेवली आहे. या विधेयकामुळे शेतकऱ्यांना दलालांचा त्रास पुर्वी व्हायचा तो आता होणार नाही, असे अनेक चांगले निर्यय या विधेयकाव्दारे केंद्र सरकारने घेतले आहेत. परंतु महाराष्ट्रातील आघाडी सरकारने या विधेयकाला स्थगीती दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर मोठा अन्याय होणार आहे. म्हणून महाराष्ट्र सरकारने ही शेतकऱ्यांना न्याय मिळवून ध्यावा अन्यथा भारतीय जनता पार्टीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असे निवेदन उमरगा भाजपच्या वतीने उमरगा तहसीलदार संजय पवार यांना देण्यात आले.

 यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अभयराजे चालुक्य, भाजपा उमरगा तालुकाध्यक्ष कैलास शिंदे,जिल्हा सरचिटणीस माधव पवार,जि प समाजकल्याण सभापती दिग्विजय शिंदे ,उपनगराध्यक्ष हंसराज गायकवाड, तालुका उपाध्यक्ष अनिल बिराजदार, युवा मोर्चा अध्यक्ष महादेव सलदे,बालाजी कोराळे,आकाश जाधवर आदींसह मोठया प्रमाणात भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.


 
Top