परंडा /प्रतिनिधी :-

जिल्ह्यात पावसाने हाहाकार माजवला आहे अशातच परंडा तालुक्यातील सिना - कोळेगांव प्रकल्प,चांदणी मध्यम प्रकल्प, खासापूरी धरण पूर्ण क्षमतेने भरून वाहत आहे.तर सोनगिरी, देवगांव (खु.) सह आवारपिंपरी गावातील नद्यांना पूर आला त्यामुळे शेतजमीनी वाहून गेल्या व नागरिकांच्या घरात पाणी शिरले. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे.भाजपाचे प्रदेश सरचिटणीस आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी सोनगिरी, देवगांव, आवारपिंपरी या अतिवृष्टीमुळे बाधीत झालेल्या गावांना भेटी देऊन शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेऊन शासनाकडे सरसकट विनापंचनामे करता मदत जाहीर करण्याची मागणी केली.याआदीही अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले होते.हातातोंडाशी आलेली शेतकऱ्यांची पिक वाहुन गेली होती.आता या अतिवृष्टीमुळे उरलीसुरलेली पिकेही वाहून जाऊन शेतजमीनीचे खुपच नुकसान झाले आहे.असे आ.ठाकूर म्हणाले त्यामुळे या आघाडी सरकारने तात्काळ विनापंचनामे करता शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी अशी मागणी केली आहे.गेल्या दोन दिवसा पासून पावसाने धुमाकूळ घातल्याने काही ठिकाणी अतीवृष्टी झाल्याने नागरिक आडकून पडले होते.या बाबत आ.ठाकूर यांनी संबधीत अधिकार्‍यांना सुचना दिल्या होत्या.त्यावरून संबधीत अधिकाऱ्यांनी तात्काळ पथक घेऊन देवगाव येथील पुराच्या पाण्यात अडकलेल्या नरसाळे वस्ती वरील ९५ जणांची प्रशासनाच्या प्रयत्नाने दि.१५ गुरुवार रोजी सकाळी सुटका करण्यात आली तर नालगाव येथील सिनानदी पात्रात अडकलेल्या १२ जणांची एनडीआरएफच्या पथकाने १२ जणास बाहेर काढण्यात यश आले आहे.यावेळी आ.ठाकूर यांनी तालुक्यातील अतीवृष्टी ठिकाणी भेट देऊन परिस्थिचा आढावा घेतला व शेतकरी यांच्याशी संवाद साधून झालेल्या नुकसानीचा शासनाकडून मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले. 

 यावेळी आ.ठाकूर यांच्या समवेत तालुकाध्यक्ष राजकुमार पाटील,राजाभाऊ चौधरी,उमाकांत गोरे ,दादा गुडे,बाबासाहेब जाधव,रामदास गुडे, आदीसह अतिवृष्टीमुळे बाधीत झालेल्या सोनगीरी, खासगांव,वडनेर -देवगांव,आवारपिंपरी गावातील शेतकरी व नागरीक उपस्थित होते.


 
Top