तुळजापूर / प्रतिनिधी -  

तिर्थक्षेञ तुळजापूरात यंदा श्रीतुळजाभवानी मातेचा शारदीयनवराञोत्सव भाविकाविना संपन्न होणार असल्याने शहरातंर्गत लावलेले लाकडी बँरेकेटींग अडचणीचे व  गैरसोयीचे ठरणार असल्याने   हे बँरेकेटींग काढावेत अन्यथा  शिवसेना शहर शाखेच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे श्रीतुळजाभवानी मंदीर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी यांना देताच त्यांनी या बाबतीत पोलीस अधीक्षक यांना  लक्ष घालुन या बाबतीत योग्य ती उपाययोजना करावी असे सुचित केले.

जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, भाविकांना प्रवेश बंदी असतानाही शहरात सर्वञ चौकाचौकात बँरेकेटींग लावले आहेत. यामुळे स्थानिक नागरिक, व्यापारी, विद्यार्थ्यांची  मोठी गैरसोय होवुन नुकसान  होणार आहे. तरी अडचणी चे गैरसोयीचे ठरणारे बँरेकेटींग काढून टाकावेत अन्यथा  शिवसेना शहर शाखे तर्फे आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. या निवेदनावर  शाम पवार, सुधीर कदम,  सागर इंगळे, बाळासाहेब शिंदे, बापुसाहेब नाईकवाडी, सुनिल जाधव,  दिनेश रसाळ यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. 


 
Top