उस्मानाबाद/ प्रतिनिधी

 भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस तथा विधान परिषदेतील मुख्य प्रतोद आमदार सुजितसिंह ठाकूर यांना हृदयविकाराचा सौम्य झटका आल्याने सोलापूर येथील एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर  आहे. पुढील उपचारासाठी त्यांना मुंबई येथे सोमवारी सकाळी हलविण्यात आले आहे. 

आमदार ठाकूर यांना ९ ऑगस्ट रोजी कोरोनाचा संसर्ग झाल्या नंतर त्यांनी त्यावर मात केली होती व त्याच दमाने आणि जिद्दीने शेतकऱ्यांचे, जनतेचे प्रश्न सोडविण्यासह कोरोना काळात संसर्ग वाढ़ नये यासाठी काम सूरु केले होते. आमदार ठाकूर यांना श्वास घेण्यासाठी त्रास जाणवत असल्याने त्यांना तात्काळ सोलापूर येथील एका खासगी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आले. तज्ञ डॉक्टर यांच्या सल्ल्यानुसार त्यांना  बायपास करण्यास सांगितले आहे. त्यानुसार बायपास व पुढील उपचारासाठी ते मुंबई मधील बांद्रा येथील खासगी रूग्णालयात प्रसिध्द ह्दयरोगतंज्ञ डाॅ.पांडा त्यांच्यावर उपचार करणार आहेत. अा. ठाकूर यांना गेल्या शुक्रवारपासून हाथदुखींचा त्रास जाणवत होता. त्या परिस्थितीत त्यांनी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या गांवाना गांठीभेटी देणे सुरूच ठेवले. शनिवार मात्र त्यांना अधिक त्रास जाणविल्यानंतर सोलापूर येथील खासगी रूग्णालयात दाखल केले होते. सोलापूर येथील डाॅ. परूळेकर यांनी शारीरिक तपासणी करून पुढील उपचारासाठी मुंबईला हलविण्यात आले,अशी माहिती त्यांचे निकटवर्तीय विकास कुलकर्णी यांनी दिली. 

 
Top