उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

महाविकास आघाडी सरकारच्या काळात अवघ्या महाराष्ट्रसह उस्मानाबाद जिल्हयातील महिला सुरक्षेचा प्रश्न अतिशय गंभीर होत असून महाराष्ट्र  व जिल्हयात बलात्कार ,अत्याचार, विनयभंग व हत्याकाडांचे सत्र सुरूच आहे. त्यातच कोरोना महामारी सारख्या अति संवेदनशील काळात ही कोविड सेंटर व हाॅस्पीटल मधील कार्यरत महिला, अधिकारी / कर्मचारी यांच्यावरील अत्याचार व विनयभंगाचे सत्र सुरूच आहे. याला त्वरीत आळा घाण्याची मागणी भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा व युवा मोर्चा, युवती आघाडीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. 

या सर्व बाबींवरून असे स्पष्ट  होते की, हे सरकार महिलांच्या सुरक्षेबाबत किती असवेदनषिल व निश्क्रीय आहे. या सरकारचा प्रशासनावर देखील अंकुश नसल्यामुळे प्रशासन देखील महिला अत्याचाराच्या घटना गांभीर्याने घेत नाहीत. त्यामुळे या महाविकास आघाडी सरकारचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध केला आहे. महिलांच्या सुरक्षेबाबत निशक्रिय, झोपेचे सोंग घेतलेल्या राज्य सरकारला जागे करण्यासाठी व महाराष्ट्रातील व जिल्हयातील महिलांच्या सुरक्षेसंबंधी प्रशासनाने तात्काळ दखल घेवून कार्यवाही करावी. अन्यथा भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा व युवा मोर्चा, युवती आघाडी, उस्मानाबाद  यांच्यावतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. 

यावेळी भारतीय जनता पार्टी महिला जिल्हाध्यक्षा सौ.माधुरी गरड, भाजपा प्रदेश कार्यकारी सदस्या श्रीमती.मिनाताई सोमाजी, जिल्हा सरचिटणीस सौ.आशा लांडगे, युवती जिल्हाध्यक्षा पुजा देडे, युवती जिल्हा सरचिटणीस पुजा राठोड, चिटणीस स्वाती षिंदे, सौ.मंजुशा कोकीळ, अंजली बेताळे, सौ.शोभा ठाकूर, सुशमा भोसले, सुशिला पवार, सौ.मिना हजारे यांच्यासह भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर, सुजित साळुंखे, कुलदीप भोसले, सचिन लोंढे, श्रीराम मुंबरे, सचिन काळी यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.


 
Top