उस्मानाबाद / प्रतिनिधी-

उस्मानाबाद जिल्ह्याचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी रविवारी (दि.४) परंडा तालुक्यातील टाकळी येथील वीरगती प्राप्त जवान वामन पवार यांना श्रद्धांजली अर्पण करुन त्यांच्या कुटुंबियांची भेट घेत सांत्वन केले.

यावेळी भूम पंचायत समितीचे उपसभापती बालाजी गुंजाळ, युवा नेते रणजित पाटील आदींसह शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसैनिक व ग्रामस्थ उपस्थित होते. दरम्यान जवान वामन पवार हे भारतीय सैन्य दलात मागील १७ वर्षांपासून कार्यरत होते. भारत व चीन दरम्यान सुरू तणावाच्या पार्श्वभूमीवर लडाख येथे चीन सीमेवर कर्तव्यावर असताना त्यांना वीरगती प्राप्त झाली.


 
Top