तेर/ प्रतिनिधी 

मासेमारीच्यk कारणावरून एकाचा खून झाल्याची घटना 16 आक्टोंबरला भंडारवाडी येथे घडली.

टाकळी ढोकी येथील सलिम शमशोद्दीन शेख  (49)  हे 16 आक्टोंबरला सकाळी 7 वाजता मासे पकडण्यासाठी भंडारवाडी येथील तेरणा नदीवर गेले असता भंडारवाडी येथील मुन्ना रावसाहेब अंधारे व गोविंद चंदू एडके यानी सलिम शेख यास मासेमारीच्या कारणावरून पोटात  पाठीवर काठीने व लाथाबुक्याने मारहान केल्याने मरण पावले.या घटनेबाबत ढोकी पोलिस स्टेशनला 258/2020 कलम 302,34 भादवि प्रमाणे दोन्ही आरोपीविरूद्ध गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक जाधव करीत आहेत.

 
Top