उस्मानाबाद / प्रतिनिधी-
उस्मानाबाद जिल्हयातील तुळजापूर येथे दिनांक 09ऑक्टोंबर 2020 ते 01 नोव्हेंबर-2020 या कालावधीत श्री.तुळजाभवानी शारदीय नवरात्र महोत्सव साजरा होणार आहे.
या कालावधीत तुळजापूर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी जिल्हाधिकारी, कौस्तुभ दिवेगांवकर (भा.प्र.से.) यांनी अधिकाराचा वापर करुन मुंबई दारुबंदी कायदा 1949 मधील कलम क्र. 142 (1) अवये नियमाचा वापर करुन दि.17ऑक्टोंबर 20 घटस्थापना , दि. 25 ऑक्टोंबर 20 होमावर धार्मिक विधी व दि. 30 ऑक्टोबर-20 रोजी कोजागिरी /मंदिर पोर्णिमा या दिवशी तुळजापूर शहरातील (प्रॉपर) सर्व देशी विदेशी दारु दुकाने, बिअरबार,परमिटरुम एफएल/बीआर-२/ एफएल-4 इत्यादी अबकारी अनुज्ञप्त्यां बंद ठेवण्याचे व विक्री बंद ठेवण्याचे आदेश जारी केले आहेत.