उस्मानाबाद/ प्रतिनिधी
लोहारा येथे तहसील कार्यालयावर मोर्चा काढल्याप्रकरणी आंदोलकांवर लोहारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सास्तूर येथील मुलीवर अत्याचाराची घटना नुकतीच घडली असून, या घटनेच्या पार्श्वभूमीवर लोहारा शहरात सोमवारी मोर्चा काढण्यात आला होता.वास्तविक, कोविड संसर्गाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांनी विविध मनाई आदेश जारी केले आहेत, असे असतानाही ते मनाई आदेश झुगारुन उमाकांत लांडगे, दगडु तिघाडे (दोघे रा. लोहारा), गणेश सोनटक्के (रा. जळकोट), प्रकाश घाेडके(रा. माकणी), तानाजी गायकवाड (लोहारा (खु.), रंजना हासुरे (रा. हराळी), आशिष पाटील (रा. वाशी), विष्णु वाघमारे (रा. सास्तुर), तिम्मा माटे(रा. कास्ती), अशा १०० ते १५० लोकांनी एकत्र जमून लोहारा येथील छत्रपती शिवाजी चौक ते तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा काढला. यावरुन पोलिस नाईक पोपट क्षीरसागर यांच्या तक्रारीवरून नमूद ९ व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र कोविड उपाययोजना नियम ११ सह राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम ५१ (ब) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.