उस्मानाबाद/ प्रतिनिधी
दोन अनोळखी मोबाइल क्रमांकवरून तुमचे क्रेडीट कार्ड सुरू करायचे आहे, असे सांगून मोबाइलचा ओटीपी मागवून बँक खात्यातील ५५ हजार ८९८ रुपये रक्कम लंपास केली. हा प्रकार १५ ऑक्टोबरला घडला. याप्रकरणी सोमवारी आनंद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
नरेंद्र बंडोपंत झरकर यांना दोन अनोळखी मोबाइल क्रमांकावरुन कॉल आले.‘तुमचे क्रेडीट कार्ड चालू करायचे आहे’, असे सांगून अविनाश वाघमारे यांना त्या फोनवरील व्यक्तीने बोलते ठेवले. यावर अविनाश वाघमारे यांना आलेले ओटीपीचे संदेश त्यांनी वाचून खात्री न करता फोनवर बोलणाऱ्या समोरील व्यक्तीस सांगितल्याने त्या अनोळखी मोबाइल क्रमांकाच्या व्यक्तीने नरेंद्र झरकर यांच्या बँक खात्यातील ५५ हजार ८९८ रुपये रक्कम ऑनलाइन पद्धतीने स्थलांतरीत करुन नरेंद्र झरकार यांची फसवणूक केली. नरेंद्र झरकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवण्यात आला आहे.