उस्मानाबाद / प्रतिनिधी-  

खिरणी मळा येथील मोहल्ला क्लिनिक 08 मध्ये बौध्द नगर रसुल पुरा, लहुजी चौक,फकिरा नगर खिरणी मळा व इतर ग्रामिण भागातील रुग्ण उपचारासाठी येतात. होत असलेल्या रूग्ण सेवेचा सन्मान म्हणुन   फुले -शाहु -आंबेडकर उद्यान कृती समितीच्या वतीने डॉक्टरांना भारतीय संविधान देऊन सत्कार करण्यात आला. 

यावेळी रुग्ण कल्याण समिती सदस्य अ.लतिफ अ.मजीद, राजेंद्र धावारे सर, फुले शाहु आंबेडकर उद्यान कृती समितीचे गणेश रानबा वाघमारे,बाबासाहेब बनसोडे,संजय गजधने,फेरोजखान पठाण आदींची उपस्थिती होती. 

 
Top