उस्मानाबाद, लातूर व बीड जिल्हयातील ऊस उत्पादक शेतक-यांना वरदान ठरलेल्या नॅचरल शुगरच्या गाळप हंगामाचा शुभारंभ, मागील गळीत हंगामात कारखान्यास गाळपासाठी जास्तीत जास्त ऊस पूरवठा करणारे मौजे दाभा येथील ऊस उत्पादक अशोकराव टेळे आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.अश्विनी अशोकराव टेळे यांचे शुभहस्ते विधीवत पूजा करून आणि नॅचरल उद्योग समुहाचे संस्थापक अध्यक्ष कृषिरत्न बी.बी.ठोंबरे यांचे अध्यक्षते खाली विजया दशमीचे शुभ मुहूर्तावर रविवार दि. 25 आॅक्टोबर 2020 रोजी संपन्न झाला.
हंगाम शुभारंभ प्रसंगी कृषिरत्न बी.बी.ठोंबरे म्हणाले की, नॅचरलचे कार्यक्षेत्रातील मागील हंगामात लागवड केलेला आणि नॅचरल शुगरकडे नोंदवलेल्या सभासद आणि बिगर सभासद यांचा संपूर्ण ऊस गाळप करणार असून ऊस उत्पादकांनी भूलथापांना बळी पडून ऊस ईतरत्र विल्हेवाट करू नये. नॅचरल शुगरने मागील लागवड हंगामामध्ये ऊस उत्पादक शेतक-यांना विविध योजनांचे माध्यमातून कार्यक्षेत्रामध्ये ऊस लागवडीचा प्रोग्राम हाती घेवून तो वाढवला आणि त्याचे फलीत म्हणजे नॅचरलचे कार्यक्षेत्रामध्ये 10 हजार हेक्टर क्षेत्रावर ऊस लागवड झालेली आहे. सदर लागवड झालेला ऊस कार्यक्षेत्रातील सर्व सभासद आणि बिगर सभासद नॅचरल शुगरलाच गाळपास देणार याचा मला पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे कार्यक्षेत्रातील सभासद आणि बिगर सभासद यांचा संपूर्ण ऊस तोडणी प्रोग्राम प्रमाणे गाळपास स्वीकारला जाणार आहे.
पुढे बोलाताना ठोंबरे म्हणाले की, ऊस तोडणी प्रोग्रामसाठी ऊशीर तर होणार नाहीच उलट ऊस लागवड तारखेच्या आत ऊस तुटला जाणार आहे त्याचे गमक असे की, नॅचरल शुगर यावर्षी प्रतिदीन 1.00 लाख लि. ईथेनाॅलचे उत्पादन करणार असून त्यासाठी लागणारे बी हेवी मोलासेस जास्तीत जास्त काढणार आहे. त्यामुळे प्रोसेससाठी लागणारा वेळ हा कमी होवून जास्तीत जास्त दैनंदीन गाळप होणार असल्याने ऊस वेळेत गाळपास येणार आहे. नॅचरल शुगरचे ऊस दरा बाबत बोलताना त्यांनी नॅचरल शुगरचा ऊस दर हा महाराष्ट्रामध्ये टाॅप टेन मध्ये असेल आणि मराठवाडयात नंबर एकचा असेल असे ही सांगितले.
सदर कार्यक्रमाचे प्रास्तावीक कारखान्याचे संचालक पांडूरंग आवाड यांनी केले सुत्रसंचालन प्रवर्तक दिलीपराव भिसे यांनी आणि संभाजी रेड्डी यांनी आभार व्यक्त केले. सदर कार्यक्रमास कोरोनाचे संकट लक्षात घेवून आणि सोशल डिस्टन्सींगचे पथ्य पाळून कार्यक्रम पार पडला. सदर कार्यक्रमास कारखान्याचे संचालक, प्रवर्तक, सभासद, कारखान्याचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.