जिल्हयात परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी दि.18 ऑक्टोबर रोजी शरद पवार उस्मानाबाद जिल्हा दौऱ्यावर आले असता प्रथमता त्यांनी तुळजापूर तालुक्यातील काक्रंबा येथे रस्त्यावर उभे राहुन शेतीची पाहणी केली.
यावेळी नुकसानग्रस्त शेतकऱ्याने “ अतिवृष्टी ने आमच्या शेतीचे मोठे नुकसान केले असुन मदती शिवाय आम्ही उभारु शकत नाही, असे सांगुन आपण शेतकऱ्यांचे कैवारी असल्याने आम्हाला मदत देण्यासाठी सरकारला सांगा व मदत मिळवुन द्या अशी विनवणी युवा शेतकरी व्यंकट झाडे यांनी पवार साहेबांन समोर हात जोडुन केली असता पवार साहेबांनी त्याला जवळ घेवुन अंगावर हात टाकुन दिलासा दिला.
सकाळी सव्वानऊ वाजता तुळजापूर येथील हेलीपॅडवर शरद पवार हे सकाळी सव्वानऊ वाजण्याच्या सुमारास तुळजापूर येथील हेलिपॅडवर दाखल झाले नंतर त्यांनी वेळ न दवडता पाहणी करण्यासाठी काक्रंबाकडे रवाना झाले . यावेळी नुकसान पाहणी करताना त्यांनी बाधीत शेतकरी व जिल्हाधिकारी यांना समोर बोलवुन त्यांचा कडून नुकसानाची सविस्तर माहीती घेवून सास्तूरकडे रवाना झाले.
यावेळी माजी मंञी आ. मधुकर चव्हान, खा.ओमराजे निंबाळकर, जीवन गोरे सुरेश बिराजदार काँग्रेस जिल्हाध्यक्ष अँड धिरज पाटील, तहसिलदार सौदागर तांदळे,गटविकास अधिकारी प्रशांतसिंह मरोड, तलाठी बाळासाहेब पवार , जि.प.सदस्य महेंद्र धुरगुडे सह शेतकरी पक्षाचे पदाधिकारी कार्यकते मोठ्या संखेने उपस्थितीत होते.