उस्मानाबाद/ प्रतिनिधी  

लोहारा तालुक्यातील माकणी हे धरण पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला. त्यामुळे धरणाच्या‌ खालील पाणलोट क्षेत्रात असलेल्या गावात पाणी शिरल्याने अनेकजण बाहेर निघणे शक्य नसल्याने अडकून पडले होते. जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, जिपचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल नवाळे व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी वृषाली तेलुरे यांनी लातूर येथील बचाव कार्यासाठी बोटीसह बाराजणांची टीम मागविली. या टीमने लोहारा तालुक्यातील राजेगाव येथे जाऊन तेथील अडकलेल्या लोकांना सुखरूपपणे बाहेर  काढण्यात त्यांना यश आले.

 
Top