तुळजापूर तालुक्यातील सिंदफळ शिवारात लातूर सोलापूर कडे जाणाऱ्या बायपास रस्त्यावर सुरू असलेल्या पावसामुळे अचानक दरड कोसळली. मात्र रस्त्यावर कोणीही नसल्यामुळे कोणत्याही प्रकारची हानी किंवा नुकसान झाले नाही. भविष्यामध्ये अशा प्रकारच्या दुर्घटना टाळण्यासाठी जिल्ह्यातील सर्वच डोंगर कड्याच्या बाजचने जाणाऱ्या रस्त्यास जाळीदार संरक्षक बसविण्याची मागणी होत आहे.
तुळजापुर-लातुर मार्गावर झालेल्या नवीन बायपास रस्त्यावर मागील काही दिवसापासून वाहनांची वाहतूक सुरू झाली आहे. सध्या काही ठिकाणी या मार्गावर मातीचे ढीग असून गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे ती माती ओली झाल्यामुळे रस्तादेखील निसरडा झालेला आहे. त्यातच सिंदफळ शिवारातून जाणाऱ्या रोडवर दरड कोसळल्यामुळे रस्त्याच्या बाजूला असलेल्या डोंगरास संरक्षक जाळी बसविण्याचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. नगराध्यक्ष सचिन रोजकरी यांना याची माहिती मिळताच इतर नगरसेवकांना सोबत घेऊन तातडीने दिलीप बिडकॉनचे प्रकल्प व्यवस्थापक राऊत यांच्याशी संपर्क साधून तात्काळ मशनरी कामाला लावून रस्त्यावर पडलेली दगड- गोटे उचलण्यात आले.