उस्मानाबाद/ प्रतिनिधी

राज्यात उद्भवलेल्या कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर अनुसूचित जमातीच्या कुटुंबियांना सहाय्य करण्यासाठी खावटी अनुदान योजना 1 वर्षासाठी (2020-21) सुरु करण्याबाबत मान्यता देण्यात आली आहे. खावटी अनुदान योजनेअंतर्गत अनुसूचित जमातीच्या कुटुंबियांना रु.4000/(रु.चार हजार फक्त) प्रति कुटुंब अनुदान ज्यामध्ये रु. 2000/- किंमतीचे वस्तु स्वरुपात वाटप व रु.2000/- इतकी रक्कम त्यांच्या बँक/डाक खात्यात वितरीत करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

या योजनेअंतर्गत मनरेगावर एक दिवस कार्यरत असलेले आदिवासी मजुर (दि.1 एप्रिल,2019 ते 31 मार्च, 2020 या कालावधीत), आदिम जमाती सर्व कुटुंबे, पारधी जमातीची सर्व कुटुंबे, जिल्हाधिकारी यांच्या सल्ल्याने प्रकल्प अधिकारी यांनी निश्चित केलेली गरजु आदिवासी कुटुंबे ज्या कुटुंबामध्ये परितकत्या, घटस्पोटित महिला, विधवा, भुमीहीन शेतमजुर, अपंग व्यक्ति, असलेले कुटुंब, अनाथ मुलांचे संगोपन करणारे कुटुंब, वैयक्तीक वनहक्कधारक कुटुंबे या लाभार्थ्यास लाभ अनुज्ञेय आहे.

प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, सोलापुर जि. सोलापुर या कार्यालयाच्या कार्यक्षेत्राअंतर्गत येणा-या सोलापुर व उस्मानाबाद जिल्ह्यातील अनुसूचित जमातीच्या परित्यक्त्या, घटस्फोटित महिला, विधवा, भुमीहीन शेतमजुर, अपंग व्यक्ति असलेले कुटुंब, अनाथ मुलांचे संगोपन करणारे कुटुंबे यांनी त्यांच्यास्तरावर कुटुंब प्रमुखाचे आधार संलग्न बँक खाते/डाक (पोस्ट ऑफिस) खाते उघडण्याबाबत, ज्या आदिवासी किंवा पारधी कुटुंबाच्या कुटुंबप्रमुखाकडे आधार लिंक बँक/ डाक खाते उपलब्ध नाही. अशा कुटुंब प्रमुखाचे आधार संलग्न बँक खाते /डाक (पोस्ट ऑफिस) खाते त्यांच्यास्तरावर उघडण्याबाबत, मनरेगावर एक दिवस कार्यरत असलेले आदिवासी मजूर (दि.1 एप्रिल,2019 ते 31 मार्च, 2020 या कालावधीत), यांची आधार संलग्न बँक खाते/डाक(पोस्ट ऑफीस)खाते त्यांत्यास्तरावर उघडण्याबाबत.ज्या पारधी कुटुंबाकडे रेशनकार्ड उपलब्ध नाहीत.अशा कुटुंबांनी संबंधित तहसिलदार यांचेकडे रेशनकार्ड मिळणे बाबत विहित नमुन्यात अर्ज सादर करण्याबाबत तसेच पारधी कुटुंबप्रमुखांना आधार कार्ड,रेशनकार्ड,बँकपासबुक/डाक (पोस्ट ऑफीस ) खाते उघडण्याबाबत आवाहन करण्यात येत असून  एस.बी.आंधळे (प्र.कार्यालय अधिक्षक) मो.नंबर 8369688911 यांना संपर्क साधावा.असे आवाहन प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प सोलापूर यांनी केले आहे.

 

 
Top