उस्मानाबाद / प्रतिनिधी-

जि.प. प्रा. शा निलेगाव  येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारत रत्न लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करून विद्यार्थ्यांना  खर्चातून स्वाध्याय पुस्तिकाचे वाटप करण्यात आले .  दि 2 ऑक्टोबर रोजी शाळेत  जयंतीनिमित्त कार्यक्रम घेण्यात आला  

प्रारंभी शाळेचे मुख्याध्यापक शिवाजीराव जाधव यांच्या हस्ते दोन्ही महामानवाच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.यावेळी शाळेतील शिक्षक व पवन सुर्यवंशी, शिवानंद सर, बसवेश्वर परकाळे, बबन गोरे, प्रकाश जाधव,गुरुलिंग धावणे यांच्यासह गावातील नागरिक व पालक उपस्थित होते. त्यानंतर शाळेतील सर्व शिक्षक यांनी स्वतः वर्गणी गोळा करून शाळेतील 1 ली ते 8 वि च्या  जवळपास 300 विद्यार्थ्यांना स्वाध्याय पुस्तिका चे वाटप करण्यात आले.

शिक्षकांनी या केलेल्या उपक्रमाचे नळदुर्ग बिट च्या विस्तार अधिकारी  राऊत मॅडम  व शहापूर केंद्राचे केंद्रप्रमुख  बळवंत सुरवसे व गावातील सर्व नागरिक , सरपंच, उपसरपंच तसेच शालेय समिती अध्यक्ष व उपाध्यक्ष सर्व सदस्य यांनी कौतुक केले.   

 
Top